मुंबई – सध्या “केजीएफ चॅप्टर-2′ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. चित्रपटात रॉकी भाईची डॅशिंग भूमिका साकारणारा यश यांच्या अभिनयाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. या ऍक्शन चित्रपटात त्याने अँग्री यंग मॅनची भूमिका उत्तमी प्रकारे निभावली आहे. त्याच्या
अभिनयावरून सोशल मीडिया युजर्ससह बॉलीवूड कलाकारांनीही यशवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.त्यामध्ये बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतचं नाव आघाडीवर आहे.
कंगना राणावतने या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असून या पोस्टमध्ये अभिनेता यशच्या अभिनयाबाबत आपलं मत लिहिले आहे. सध्या कंगनाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कारण बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि केजीएफच्या यशची तुलना केली आहे.
कंगनाने पोस्ट मध्ये लिहिले आहे की,’यश हा आता नवा अँग्री यंग मॅन आहे. जो गेल्या काही वर्षांपासून गायब झाला होता. तो आता परत आला आहे. अमिताभ यांचा अँग्री यंग मॅन हा सत्तरीच्या काळात होऊन गेला. त्यानंतर ती जागा यशनं घेतली आहे.’ इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिनं यशचं कौतुक केलं आहे. तसेच आपल्या पोस्टमध्ये कंगनानं अभिनेता यशची तुलना महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे.
सध्या कंगनाची हि पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान २०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ हा चित्रपट बिग हिट ठरला होता. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रशांत नील यांनी प्रेक्षकांसाठी दुसरा भाग घेऊन आले आहे. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज झाला असून मूळ कन्नड भाषेत असणारा हा चित्रपट तेलूगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे.