…म्हणून हार्ले डेव्हिडसन कंपनीने थांबविले भारतातील उत्पादन

नवी दिल्ली -विक्री होत नसल्यामुळे जगभरातील कामकाज फेररचनेचा भाग म्हणून हार्ले डेव्हिडसन या कंपनीने भारतातील उत्पादन प्रकल्प बंद केला आहे.

मात्र, भारतातील वितरण आणि वाहनांची देखभाल चालूच राहील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. आता ही कंपनी भारतातील एखाद्या कंपनीशी सहकार्य करून उत्पादन आगामी काळात काही प्रमाणात सुरू ठेवण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे.

कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतातील ग्राहकांना त्यांच्या वाहनाची देखभाल करण्यासाठी आणि सुट्या भागासाठी कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. आगामी काळात परिस्थिती पाहून कंपनी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

भारतात महागड्या आणि जास्त क्षमतेच्या मोटारसायकलला फारशी मागणी नाही. या कंपनीने बराच प्रयत्न करूनही गेल्या अनेक वर्षांपासून विक्री होत नसल्यामुळे शेवटी उत्पादन बंद करावे लागले असल्याचे समजले जाते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.