सेऊल – दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला लक्ष्य करण्याची क्षमता असलेल्या रॉकेट लॉंचरची चाचणी उत्तर कोरियाने घेतली आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या देखरेखीखालीच ही चाचणी घेण्यात आली. देशाची मारक श्रमता वाढवण्याच्या दृष्टीने हे आधुनिक रॉकेट लॉंचर विकसित करण्यात आले असल्याचे उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. (North Korea tests rocket launcher; Capability to target South Korea’s capital city of Seoul)
एकच दिवस आगोदर उत्तर कोरियाने लघु पल्ल्याची काही पॅलिस्टिक क्षेपणास्त्रे दक्षिण कोरिया आणि जपानच्या दिशेने समुद्रामध्ये डागली होती. त्याच्या दुसर् याच दिवशी या रॉकेट लॉंचरची चाचणी घेण्यात आल्याचे दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी सांगितले.
उत्तर कोरियाचे मोठ्या आकाराचे रॉकेट लॉंचर आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमधील बेद अस्पष्ट आहेत. कारण हे रॉकेट लॉंचर स्वतःचा जोर तयार करू शकतात आणि प्रक्षेपणादरम्यान या रॉकैटना दिशादर्शन केले जाते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. उत्तरेने यापैकी काही प्रणालींमध्ये ६०० मिमी मल्टिपल रॉकेट लाँचर्सचा समावेश आहे. यांचीच सोमवारी चाचणी घेण्यात आली, ही रॉकेट सामरिक आण्विक शस्त्रांचा मारा करण्यास सक्षम असणार आहेत.
रिम जोंग उन यांनी २०२२ पासून वेगवेगळ्या क्षमतेची क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे कोरियाच्या द्विपकल्पामध्ये तणानिर्माण झाला आहे. जपान आणि दक्षिण कोरिया ही उत्तर कोरियाची प्राथमिक लक्ष्ये आहेत. तर थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीवर मारा करू शकतील अशी क्षेपणास्त्रेही उत्तर कोरियाने विकसित केली आहेत.