मुंबई – द कपिल शर्मा शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी ओळखला जातो. कॉमेडी स्टार कपिलच्या या शोमध्ये अनेक सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात. नुकतंच या शोचा एक प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि नोरा फतेही सुद्धा दिसत आहे. हा प्रोमो चर्चेत येण्याचं कारण कोणताही चित्रपट नसून नोराने शो दरम्यान डेटबाबत केलेलं विधान आहे.
नोरा फतेही आपल्या जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाते. फार कमी वेळात नोराने बॉलिवूडममध्ये आपले पाय रोवत दमदार यश मिळवल आहे. नुकतंच तिने कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी अक्षय कुमार देखील उपस्थित होता. चार चार हिरोईनसोबत विदेशात जाणार असल्याने मला दुःख होत असल्यासारखे घरी दाखवायचे आहे कस दाखवू ? असा सवाल अक्षय कुमार कपिलला यावेळी विचारतो.
कपिल मात्र अक्षयला सरळपणे उत्तर न देता अर्चना पुरन सिंहला म्हणतो, तुम्हाला ,माहिती आहे का अर्चनाजी नुकतंच नोराने मीडियाला एक प्रतिक्रिया दिली होती . त्यात ती म्हणते मुलगा आणि मुलगी डेटवर जात असतील तर बिल मुलानेच भरायचं. यावर अर्चना उत्तर देत म्हणते, आता जमाना बदलला आहे आता महिला देखील आपलं बिल भरतात.इतक्यात शांत बसलेली नोरा फतेही अर्चना पुरन सिंहला म्हणते,तुम्ही असं करू शकता पण मी असा काही करत नसते. यानंतर शोमध्ये एकच लाफ्टर सुरु होतो.
View this post on Instagram
द कपिल शर्मा शोचा हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. नोरा फतेही डेटबाबत स्पष्ट मत व्यक्त केल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. नोराने नुकतंच थँक गॉड या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत आयटम सॉंग केलं होत.