Kapil Sharma – कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शोचा शेवटचा सीझन संपल्यापासून तो टीव्हीपासून दूर राहिला आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या (The Kapil Sharma Show) पुढच्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकतंच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे.
आता कपिलचा (Kapil Sharma) शो टीव्हीवर नाही तर ओटीटीच्या नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. शोचा प्रोमो पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्सुक दिसत आहेत. पण प्रत्येक सीझनप्रमाणे यावेळीही शोमधून एक पात्र गायब होणार आहे.
द कपिल शर्मा शोचा प्रोमो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्याची सुरुवात कपिल शर्माच्या संभाषणापासून होते. कपिल त्याच्या PA ला जुने सामान काढायला सांगतो. कपिल शर्माने सर्वप्रथम फ्रीज उघडला आणि त्यात अर्चना पूरण सिंह मिठाईचा बॉक्स घेऊन बसलेली दिसते. अर्चनाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि कपिलने फ्रीज बंद केला.
यानंतर कपिल म्हणतो, “त्याला इथे कोणी बोलावलं? पहिली गोष्ट म्हणजे, फ्रीज खूप जुना आहे आणि त्यातील सामान आणखी जुने आहे.” असं या टिझर पाहायला मिळत. सध्या हा टिझर सगळीकडे व्हायरल होत असून, कपिलचे फॅन्स यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा हळूहळू शोपासून दूर जात आहेत…
अभिनेता कृष्णा अभिषेक गेल्या सीझनच्या प्रोमोमध्ये दिसला नव्हता आणि यावेळी सुमोना प्रोमोमधून गायब दिसत होती. परस्पर मतभेद किंवा फीच्या मुद्द्यांमुळे ती या सीझनचा भाग नसल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. शोमध्ये चंदूची भूमिका साकारणाऱ्या चंदन प्रभाकरनेही गेल्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसल्यानंतर शो सोडला आहे.
कपिलच्या शोमधील अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा हळूहळू शोपासून दूर जात आहेत. भारती सिंग, सिद्धार्थ सागर यांच्यासह अनेक कलाकार आता कपिल शर्माच्या शोमध्ये दिसत नाहीत.