मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा आठवड्याभरात पुन्हा एकदा विस्तार होईल. त्यामुळे काळजी करू नका, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा काल शपथविधी झाला. तुमचे आमदार नाराज आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. तुम्हाला कोणी फोन केला होता का? की आमदार नाराज आहेत. कोणी नाराज नाही, असे उत्तर त्यांनी दिले. मग तुमचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. तातडीने एक आठवड्यात आमचाही मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.