मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘फरहान अख्तर’ आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री ‘शिबानी दांडेकर’ नुकतेच विवाह बंधनात अडकले आहे. हे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा स्थीत फार्म हाऊसवर मोजक्या पाहुण्यांच्या आणि घरच्या लोकांच्या उपस्थतीत हा विवाह सोहळा पार पडला. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होती.
सध्या सोशल मीडियावर फरहान-शिबानी यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असून, चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. या विवाहसोळ्याला अभिनेता हृतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांनी आवर्जून हजेरी लावली होती. विशेष म्हणजे शिबानी आणि फरहान यांनी निकाह न करता किंवा सप्तपदी न घेता हटके पद्धतीने लग्न केलं आहे. ज्याची सध्या सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, फरहान अख्तरचं हे दुसरं लग्न असून त्याने पहिल्या पत्नीसोबत 16 वर्षे संसार देखील केला आहे. तसेच त्याला पहिल्या पत्नीकडून दोन मुली देखील आहेत. शिबानी दांडेकर ही मागील चार वर्षापासून फरहान अख्तर याला डेट करीत होती. दोघांचे संबंध अधिक चांगले असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात होते. मात्र, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आज अखेर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.