नवी दिल्ली : देशात लागू केलेल्या लॉक डाऊनचा लाभ होत असल्याचे निष्पन्न झाल्याने तो आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 3 मे नंतर तत्विने दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे. बाधित झोन कोणताही असला तरी केंद्र सरकारच्या गृह खात्याने काही निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यात विमान, रेल्वे प्रवास, आंतरराज्य बस प्रवास यांचा समावेश आहे. या शिवाय शैक्षणिक संस्था सुरू करण्यावरही बंदी आहे
झोनचा विचार न करता बंदी असणाऱ्या बाबी
- हवाई प्रवास, रेल्वे, मेट्रो प्रवास आणि रस्ता मार्गे आंतर राज्य प्रवास
- शाळा, महाविद्यालये, आणि अन्य शैक्षणिक. प्रशिक्षण संस्था आणि शिकवणी वर्ग
- हॉटेल आणि रेस्टॉरंट्स यांसह सर्व आदरातिथ्य सेवा
- चित्रपट गृह, मॉल,जिम, क्रीडा संकुल यांसारखी गर्दीची ठिकाणे.
- सामाजिक राजकीय, सांस्कृतिक आणि सर्व प्रकारचे समारंभ
- सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे जनतेसाठी बंद असतील
- हवाई. रेल्वे किंवा रस्ता मार्गे निवडक कारणांसाठी प्रवास करता येईल.
सातच्या आत घरात
सर्व झोनमध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास कडक मनाई असेल. सर्व जिल्ह्यात जमावबंदी असेल. त्याची कडक अंमलबजावणी होईल. सर्व झोनमध्ये ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दहा वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक गरजा भागवणे आणि वैद्यकीय करणांशिवय घराबाहेर पडत येणार नाही.
तिन्ही झोनमध्ये दवाखाने सुरक्षिततेचे नियम पाळून उघडता येतील. मात्र ही परवानगी प्रतिबंधित क्षेत्रात नसेल.