सेऊल – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा नेते किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक झाली असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून फिरत होते. यामुळे जगभरात मोठी खळबळ निर्माण झाली. मात्र, शुक्रवारी तब्बल २१ दिवसांनंतर किम जोंग उन हे सर्वांसमोर आले आहेत. यामध्ये किमची तब्येत ठणठणीत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
उत्तर कोरियाच्या सरकारी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. यावेळी किमची बहीण किम यो जोंग देखील उपस्थित होती.
#BREAKING NKorea’s Kim makes first public appearance in nearly three weeks, according to Yonhap pic.twitter.com/xlJtXdkFQE
— AFP news agency (@AFP) May 1, 2020
दरम्यान, काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांची प्रकती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता उत्तर कोरियानं दिलेल्या माहितीनंतर त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.