बालिकाश्रम रस्त्यावरील फर्निचरच्या दुकानाला आग

नगर – शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील फर्निचरच्या दुकानास गुरुवारी (दि.21) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. फर्निचरचे दुकान असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत सुमारे 50 लाखांचे साहित्य जळून गेले.

बालिकाश्रम रस्त्यावर राजू म्याना यांचे न्यु स्टाईल फर्निचरचे दुकान आहे. दुकानात लाकडी आणि स्टील पासून कपाटे, बेडसह विविध फर्निचरच्या वस्तू होत्या. पहाटे या दुकानातून आगीचे लोट बाहेर पडताने दिसताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती कळवली. त्यानंतर महापालिका, एमआयडीसी महामंडळ, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. व आग आटोक्‍यात आणण्यात आली.

दरम्यान दुकानातील सुमारे 50 लाखाचे फर्निचर जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन विभागाचे अरीफ इनामदार, अशोक काळे, रामदास औटी, दत्ता शिंदे, अशोक पटारे, भांबरे आदीसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्‍यात आणली.

Leave A Reply

Your email address will not be published.