उपक्रमशील शाळांना मिळणार सहलीचा आनंद

नगर – जिल्हा परिषदेच्या ज्या प्राथमिक शाळा विविध उपक्रम राबवित आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राज्यात व राज्याबाहेरही शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

यात जिल्ह्यातील एकूण 75 शाळांची निवड केली जाणार असून त्यातील पहिल्या दहा शाळांतील प्रत्येकी दहा याप्रमाणे शंभर मुलांना राज्याबाहेर तर उर्वरीत 65 शाळांतील दहा याप्रमाणे 650 मुलांना राज्यातंर्गत विविध जिल्ह्यात शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने समग्र शिक्षा अभियानातंर्गत पहिल्या दहा शाळांच्या सहलीसाठी तीन लाख रूपये निधी तर राज्यातंर्गत विविध जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या 65 शाळांच्या सहलींसाठी 1 लाख 30 हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. जानेवारी-डिसेंबरमध्ये या सहली निघणार असून त्यात सहावी ते आठवीच्या मुलांचा समावेश असणार आहे.

सहली कुठे भेट देणार?

ऐतिहासिक स्थळे,विविध शैक्षणिक स्थळे,सामाजिक-शैक्षणिक उपक्रम

शाळा निवडीचे निकष

शिष्यवृत्ती व विविध गुणवत्तायादीत आलेले अ श्रेणीतील विद्यार्थी,शाळांमध्ये राबविलेले इतर विविध उपक्रम व त्यात सदर विद्यार्थ्यांचा सहभाग,विज्ञान प्रदर्शनातील सहभाग

Leave A Reply

Your email address will not be published.