तालुका, एमआयडसी पोलीस ठाण्या ह्ददीत सुरू करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरपोहच सेवा
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
नगर – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देश लॉक डाऊन असून अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, नगर तालुक्यातील अनेक गावात अत्यावश्यक सेवेबरोबरच मद्याचीही जोदार विक्री सुरू आहे. 60 रुपयांची दारू तब्बल 250 रुपयांना दिली जात आहे. तसेच ग्राहकांच्या मागणी नुसार ती घर पोहच पुरविले जाते असून स्थानिक पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष झाले आहे.
नगर तालुक्यातील जेऊर, हिंगणगाव, नेप्ती, पिंपळगाव माळवी,वाळकी, देहरे परिसरात जोरदार विक्री सुरू आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आताना मात्र, अवैध धंदे मात्र जोरात सुरू आहेत. 60 रुपयांची देशी दारूची बाटली चक्क 250 रुपयांना विकली जात आहे. तसेच ती सेवा मागणी नुसार घरापोहच दिली जात आहे. देश लॉक डाऊन असून अवैध धंदे मात्र तेजीत सुरू आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.