नवी दिल्ली : नितीश कटारा खून प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी प्रकरणातील आरोपी विकास यादव याला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने पॅरोल देण्यास नकार दिला आहे. सध्या विकास यादव 25 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहेत.
Supreme Court has refused to grant parole to Vikas Yadav, who is undergoing a 25-year jail term in Nitish Katara murder case. pic.twitter.com/ifsodjreEh
— ANI (@ANI) November 4, 2019
16 फेब्रुवारी 2002 रोजी रात्री नितीश कटाराची विकास, विशाल आणि सुखदेव पहलवान यांनी मिळून हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. वस्तुतः विकासला त्यांची बहीण भारती यादव यांची नितीश कटाराशी मैत्री आवडली नाही.
भारती आणि नितीश दोघांनाही लग्न करायचं होतं पण विकास आणि त्याच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हते त्यामुळे नितीशची विकाससह अन्य तिघांनी मिळून हत्या केली होती.