प्रियांका-निक, दीपिका-रणवीर, अनुष्का-विराट अशा लव्ह मॅरेजचा सध्या सिझन असताना दाक्षिणात्य स्टार अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे अरेंज मॅरेज करणार असल्याचे काजलने सांगितले आहे. एका मुलाखतीत तिने सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
काजल अग्रवालने दक्षिणेतील जवळपास सर्व सुपरस्टारसोबत काम केले आहे. परंतु, तिच्या अफेअरची चर्चा कधीच झाली नाही. सिंघम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या काजलचे अनेक चाहते आहेत. काजलचा होणार नवरा सिनेसृष्टीशी संबंधित नसल्याचे तिने याआधीच स्पष्ट केले होते. तसेच २०२०मध्ये ती लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. काजलचा नवरा व्यावसायिक असून तिच्या आई-बाबांनी पसंत केला आहे.
दरम्यान, काजल सध्या ‘इंडियन २’ आणि ‘मुंबई सागा’ या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.