नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशातील रस्त्यांचा रोडमॅप मांडला. लोकसभेत ते म्हणाले की, 2024 पर्यंत देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीने असतील. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्यास शेतीबरोबरच पर्यटनातही रोजगाराच्या संधी वाढतील. यावेळी गडकरींनी अतिरिक्त टोलनाके बंद करण्यासंदर्भात मोठी घोषणा करताना त्यांच्या विभागाने केलेल्या चार विश्वविक्रमांची माहिती दिली.
गडकरी यांनी टोलनाक्यांसंदर्भात मोठी घोषणा करताना म्हटलं की, आम्ही टोल प्लाझाच्या जवळ राहणार्या लोकांना आधार कार्डाच्या आधारे पास देणार आहेत. या पासच्या आधारे ते मोफत प्रवास करू शकतील. तसेच, मी खात्री देतो की ६० किलोमीटरमध्ये एकच टोलनाका असेल. मात्र ६० किमीच्या आत दुसरा टोल नाका असेल तर तो पुढील ३ महिन्यांत बंद होईल, असंही गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं.
या व्यतिरिक्त गडकरी यांनी त्याच्या मंत्रालयाने केलेल्या चार विश्वविक्रमाची माहिती लोकसभेत दिली. ते म्हणाले की, आमच्या विभागाने चार विश्वविक्रम केले आहेत. देशासाठी आम्हाला याचा अभिमान आहे. पहिला जागतिक विक्रम रोज 38 किमी रस्ता बांधला.
We’ll provide passes to locals having Aadhaar cards who reside near toll plazas. Further, I ensure that there will be only one toll plaza within 60 kms & if there’s a 2nd toll plaza, then it will be shut in next 3 months: Union Road & Transport minister Nitin Gadkari in Lok Sabha pic.twitter.com/PQbAlL8nEk
— ANI (@ANI) March 22, 2022
तसेच एक आठवड्यापूर्वी आम्ही 50 किमी लांबीचा सिंगल लेन रस्ता अवघ्या 100 तासांत बांधला. हा विक्रम गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात दिल्ली-वडोदरा ग्रीनफिल्ड अलाइनमेंटवर घडला. आम्ही वडोदराजवळ चार लेनचा 2.5 किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या 24 तासांत बांधला. नंतर NH 52 वर सोलापूर ते विजापूर दरम्यान 26 किमीचा सिंगल लेन रस्ता अवघ्या 21 तासांत बांधला. गडकरी म्हणाले, मला आनंद आहे की कंत्राटदाराच्या तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे.