मुंबई – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मारहाणीनंतर उद्धव यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबूकवर पोस्ट केली म्हणून रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना, राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे म्हटले आहे.
यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक प्रवक्त्या घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. अशात भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. “इथून पुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात, तर तुम्हाला सोडणार नाही, याला धमकी समजा”, अशा शब्दांत बावकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावर आता (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख सासडेतोड उत्तर दिले आहे.
नितीन देशमुख म्हणाले की,’चंद्रशेखर बावनकुळे हा मतिमंद माणूस आहे. बावनकुळे याची काय लायकी आहे? उद्धव ठाकरे साहेबांना घराच्या बाहेर निघू न देण्याची भाषा करतोय. तुम्ही जर खरं दूध प्यायला असाल तर उद्धव साहेबांना घराबाहेर निघण्यापासून रोखून दाखवा.’ असं म्हणत टीका केली आहे.