मुंबई – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मारहाणीनंतर उद्धव यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदेची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. या घटनेचे ठाण्यात राजकीय पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना, राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे म्हटले होते. ठाकरेंच्या या टीकेला आता देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. आम्ही फडतूस नाही तर काडतूस आहोत असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबूकवर पोस्ट केली म्हणून रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. यावर आता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “आज मला म्हणाले फडतूस गृहमंत्री, उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हूँ मै.. झुकेगा नहीं साला घुसेगा” असं म्हणत फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला.
नागपूरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप झाला त्यावेळी झालेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंसह अनेकांचा समाचार घेतला. ‘कोण होतास तू काय झालास तू’ असं म्हणत फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांसाठी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारल्याची आठवण देखील करून दिली.
He (Uddhav Thackeray) said today that, I’m ‘Fadtus’ (useless). I want to tell him that I am not Fadtus but a ‘Kartoos’ (bullet). I won’t bow down but pierce: Devendra Fadnavis, Maharashtra Dy CM pic.twitter.com/F5KdJtY28q
— ANI (@ANI) April 4, 2023
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे नेमकं
मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत फेसबूक पोस्ट केल्यानंर ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील आपल्या कार्यालयातून संध्याकाळी परतत असताना रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले असल्याची टीका यावेळी ठाकरेंनी केली होती.