मुंबई – प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. अनुपमा या मालिकेत नितेश धीरज कपूरची भूमिका साकारत होते. हृदयविकाराच्या झटक्याने नितेश यांचा मृत्यू झाला.
मुंबईजवळील इगतपुरी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या काही तास आधी, त्यांनी रिसॉर्टमधून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ते हॉलिडे एन्जॉय करताना दिसत होते.
नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी भावूकी पोस्ट शेअर करत आहेत. हसतमुख हसरा चेहरा आज आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जात आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते भारतीय टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा होते.
त्यांनी अनुपमा या लोकप्रिय शोमध्ये धीरज कपूरची भूमिका साकारली होती. त्यांनी अनुजचा मित्र म्हणून शोमध्ये एंट्री घेतली. त्याचा ट्रेक अजूनही सिरीयलमध्ये चालू होता. नितेश पांडे यांच्या निधनाची बातमी ऐकून अनुपमा शोच्या टीमला धक्का बसला आहे.