पणजी : निर्भया प्रकरणानंतर तपास यंत्रणा वापर करत असलेल्या मेडिको लिगल प्रक्रियेत मोठे बदल घडून आले. या चित्रपटात मी काल्पनिक प्रसंगातून जर आज निर्भया हयात असती तर तिचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तीच या चित्रपटामागील प्रेरणा आहे असे ‘रंगनायकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दयाळ पद्मनाभन यांनी सांगितले. एका प्रकारे 1981 मध्ये आलेल्या आणि माझ्यावर मोठा प्रभाव असलेल्या ‘रंगनायकी’ या चित्रपटाला मी वाहिलेली आदरांजली आहे असेही ते म्हणाले.
या प्रकरणाच्या सामाजिक बाजूंवर या चित्रपटाचा प्रकाशझोत असून सहसा चित्रपटात शारीरिक अत्याचार पीडित घेत असलेल्या बदल्याच्या कथेपेक्षा हा चित्रपट वेगळा आहे. या चित्रपटात तीन प्राचीन शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी विशेषत्वाने दाखविण्यात आली आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर शारीरिक अत्याचार झालेल्या एका मुलीने धाडस दाखवून तक्रार नोंदवली आणि हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे, असे दयाळ पद्मनाभन यांनी स्पष्ट केले.