“नीरा भीमा’चा दर प्रति टन 2601 रुपये

रेडा  – इंदापूर तालुक्‍यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने 2018-19 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रति टन 2601 रुपये दर जाहीर केला आहे, अशी माहिती कारखान्याने अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.

लालासाहेब पवार म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नीरा भीमा कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामात 520170 मे टन उसाचे गाळप केले. या हंगामासाठी कारखान्याची एफआरपी 2473 रुपये इतकी आहे. कारखान्याने यापूर्वीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची सर्व रक्‍कम 2473 रुपये दिली आहे. आता एफआरपीपेक्षा जाहीर केलेली जादा देय रक्‍कम लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये वर्ग केली जाईल.

मागील गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची देय रक्‍कमही लवकर दिली जाणार आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, अशोक वणवे, शिवाजी शिंदे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.