मुख्यमंत्री, धनगर आंदोलकांमध्ये खडाजंगी

बारामती – आरक्षण कधी देणार हे पाहिले सांगा, याचे उत्तर द्या, धनगर समाजातील आंदोलकांचे गुन्हे कधी मागे घेणार, आदी प्रश्‍नांचा भडीमार धनगर समाज आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही या विषयात राजकारण करताय असे म्हणाल्यानंतर आंदोलक व आंदोलकांमध्ये खडाजंगी होताच मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.

भाजपची महाजनादेश यात्रा शनिवारी (दि. 14) बारामती येथे आली होती. दरम्यान, या यात्रेत मेंढ्या घुसवण्याचा इशारा धनगर आंदोलकांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी धनगर समाजातील बापूराव सोलनकर, अविनाश भिसे, माणिक काळे, विजय गावडे, दिलीप नाले, कुंदन देवकाते, आबा बोरकर, आबा टकले, महेश गावडे, निखिल देवकाते यांच्या सहित अनेक कार्यकर्त्यांना गुणवडी चौकातून ताब्यात घेतले.

व पोलिसांच्या गाडीतून अंदोलकाना एमआयडीसी येथील विमानतळ येथे घेऊन गेले. व आंदोलन करू नका, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ दिली आहे, असे म्हणून विमानतळ येथे मुख्यमंत्र्याची व आंदोलकांची चर्चा झाली. व यावेळी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांना यावेळी 2014 रोजी धनगर आरक्षणाचा शब्द दिला होता त्याच काय झालं? “क्‍या हुवा तेरा वादा’ असा प्रश्‍न विचारताच मुख्यमंत्री म्हणाले आरक्षणाचा प्रश्‍न न्याय प्रविष्ट आहे, असे उत्तर देताच आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्‍नांचा भडिमार केला.

सरकारच्या दडपशाहीचा नोंदविला निषेध

घटनेप्रमाणे असलेले अनुसूचित जमातीचे धनगर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशा प्रकारची सरकारने व राजकीय अनेक नेत्यांनी केलेली आश्‍वासने हवेतच विरघळून गेली का? असा प्रश्‍न धनगर समाजाच्या कल्याणी वाघमोडे यांनी सरकारला विचारला आहे. तर आताच्या सरकारकाकडून पाच वर्षे फक्‍त हवेतील आश्‍वासने धनगर समाजाने ऐकली आहेत, असे त्यांनी नमूद करीत आंदोलनकर्त्यांचे निषेध आंदोलन मोडीत काढणाऱ्या सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदविला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here