निफाडमध्ये शिवसेना-भाजपची युती

Madhuvan

नाशिक – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार असतानाच निफाडमध्ये शिवसेनेने आपला जुना मित्र असलेल्या भाजपशी हातमिळवणी केली आहे. विशेष म्हणजे, निफाड पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असतानाही युती केली आहे.

यामुळे सभापतीपदी शिवसेनेच्या रत्ना संगमनेरे, तर उपसभापतीपदी भाजपच्या संजय शेवाळे यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीची चर्चा अद्याप शांत झालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर तिकडे निफाडमध्ये अनोखे चित्र पाहायला मिळाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.