मुंबई – राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे.
राज्यभरात आज 18 हजार 317 नवे करोनाबाधित आढळले, तर 19 हजार 163 जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 78.61 वर पोहचला आहे. याचबरोबर आज 481 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 13 लाख 84 हजार 446 वर पोहचली आहे. यामध्ये 2 लाख 59 हजार 33 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यत एकूण 10 लाख 88 हजार 322 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.