पुणे – स्वारगेट पोलीस ठाण्यात नऊ वर्षांपूर्वी दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली.
अनिस रफीउद्दीन सय्यद गिलाणी (रा. भागोदयनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 2011 मध्ये गिलाणीविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तेव्हापासून तो पसार होता. तो कोंढवा भागात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला मिळाली.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार वग्गू, गोरे यांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.