केडगाव- दौंड शहरासह तालुक्यात 40 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी दिली. शहरातील 30 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 6 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.
पाटील चौक, बंगला साईड, नेहरू चौक, शालीमार चौक, गजानन सोसायटी, गोपाळवाडी, जनता कॉलनी, जगदाळे वस्ती, भवानीनगर येथील प्रत्येकी एका व्यक्तीला बाधा झाली आहे. केडगाव परिसरात 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. (दि.29) यवत येथील कोविड सेंटरमध्ये 20 जणांची तपासणी करण्यात आली. आज अहवाल प्राप्त झाला आहे.