नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी दिली आहे. आज संध्याकाळी सात वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तत्पूर्वी सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच देशातील करोना परिस्थिती, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.