ओझर – खोडद (ता. जुन्नर) येथे शेतातील सामूहिक बांधावरून ये-जा करण्यावरून झालेल्या वादातून चुलत भावाने बहिणीवर विळ्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मला काळे (वय 50) असे जखमी झालेल्या बहिणेचे नाव असून त्यांनीच फिर्याद दिली आहे. तर चुलत भाऊ गोरक्ष गायकवाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, खोडद येथील गट नं 1440 च्या बांधावरून निर्मला काळे या त्यांच्या शेतातील काम उरकून घरी परतत असताना त्यांना चुलत भाऊ गोरक्ष गायकवाड याने बांधावरून येण्यास मज्जाव करत वाद सुरू केला व त्याच्या हातातील गवत कापण्याच्या विळ्याच्या साहाय्याने काळे यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.