जळोची -माळेगाव (ता. बारामती) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 लाख 70 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 33 जणांवर तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून माळेगावातील रमाबाई नगरात येथे रमन गायकवाड व इतर एका बंगल्यात बेकायदा पत्त्याचा क्लब चालवुन पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम 7 दुचाकी एकाकारसह वाहनांसह इतर जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपनिरीक्षक संदीप गोसावी, हवालदार सुरेश भोई, पोलीस नाईक रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, दत्तात्रय गवळी तसेच आर. सी. पी. पथक क्रमांक 3 मधील श्रीकांत गोसावी, रज्जाक मणेरी, आबा जाधव, सचिन दरेकर, अमोल चितकुटे, सागर कोरडे, सुजीत शिंदे, प्रियंका झणझणे, मेघा इंगळे, मंगल बनसोडे यांनी केली.