Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात महाराष्ट्रातील बारामती मतदार संघाचा देखील समावेश आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत बोलतांना पुन्हा एकदा टीका केली ते म्हणाले,’ सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर शरसंधान साधले होते. सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते.
यावर आता अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य श्रीनिवास पवार यांनी केले आहे.
ते म्हणाले ,’4 जूनला निकाल लागल्यानंतर अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.
हे वाचाल का डोप टेस्ट न दिल्याने बजरंग पुनिया निलंबित, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशांना लागू शकतो ‘ब्रेक’