शिक्रापूर -निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील एका दोघा बापलेकांनी शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून पाठीमध्ये चाकू भोकसल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघा बापलेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यवान भीमराव साठे (रा. निमगाव म्हाळुंगी) यांनी फिर्याद दिली असल्याने अमोल मसू दौंडकर व मसू दौंडकर (दोघे रा. निमगाव म्हाळुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सत्यवान साठे हे गावातील पाराजवळ कानिफ भागवत व काही लोकांसोबत चहा पीत असताना अचानक अमोल दौंडकर व मसू दौंडकर हे बापलेक तेथे आले. अमोल याने साठे यांना पकडून शिवीगाळ, दमदाटी केली. मसू दौंडकर याने चाकू काढून साठे यांच्या पाठीत भोकसला.