मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर रोज नवनवीन खुलासे ,दावे-प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत आहेत. यातच दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’बद्दल बोलू नये असं मत व्यक्त केलं यावरून आता पुन्हा वादंग निर्माण झाला आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी कठोर शब्दांमध्ये केसरकरांवर केली आहे.आम्ही गप्प बसणार नाही. असेही राणे म्हणाले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा.आणि उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल दीपक केसरकरांनी मातोश्रीवर त्यांची भांडी घासावी.’ असं म्हणत राणे यांनी व्हिडिओही शेअर केला आहे.
निलेश राणे यांचे ट्विट
दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. pic.twitter.com/LARj8cVLoO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022