मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ आहे, मात्र त्याआधी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. पडद्यावर, कंगना सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय राजकारणी इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
‘इमर्जन्सी’च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये कंगनाच्या चेहऱ्यावर पांढरे केस, हलक्या सुरकुत्या दिसत आहे. याशिवाय चित्रपटाच्या टीझरमध्ये कंगनाची अतिशय आत्मविश्वासपूर्ण शैली पाहायला मिळत आहे. इंदिरा गांधींना पूर्णपणे आपल्या व्यक्तिरेखेत आणण्यासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे.
टिझर शेआर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणीबाणीचा फर्स्ट लुक आला आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि वादग्रस्त महिलांपैकी एक पोर्ट्रेट.’
कंगना ही अशी अभिनेत्री आहे की, चित्रपटातील व्यक्तिरेखेला जिवंत करण्यासाठी कठोर परिश्रम करते. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर कंगनाचे चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी कंगना तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जय ललिता यांच्या जीवनावर आधारित थलायवी चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नसला तरी कंगनाच्या लूकने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली.
‘इमर्जन्सी’ हा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात अभिनयासोबतच कंगनाने दिग्दर्शनाची सुद्धा जबाबदारीही घेतली आहे. हा चित्रपट 25 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.