मुलगी मालती आल्यापासून निक जोनास आणि प्रियांका चोप्राचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. निक आणि प्रियांका कितीही व्यस्त असले तरी ते आपल्या मुलीसोबत वेळ घालवायला विसरत नाहीत.
निक मालतीवर खूप प्रेम करतो आणि तिचे लाड करण्याची संधी कधीही सोडत नाही. निक जोनासने नुकतेच एका मुलाखतीत प्रियांकाचे कौतुक केले आणि ती खूप चांगली आई असल्याचे सांगितले. आणि आता त्याने मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत एक मोहक फोटो शेअर केला आहे.
निकने मांडीवर घेतलेला फोटो शेअर केला. मालती खूप क्यूट दिसत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहते मालतीची तुलना निकशी करत आहे. मालती निक जोनासच्या कार्बन कॉपीसारखी दिसते, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. प्रियांका आणि निक जोनास विशेष काळजी घेतात की एक शूटिंग किंवा व्यस्त असताना, दुसरा मुलगी मालतीसोबत राहणार, तिची काळजी घेणार असल्याचे या कपल ने ठरवले आहे. प्रियांका आणि निक अनेकदा मालतीसोबत गोंडस फोटो शेअर करत आहेत
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे मालतीचे पालक बनले. काही काळापूर्वी, ‘आर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत निक जोनासने सांगितले होते की ते आणि प्रियांका बायबल आणि हिंदू धर्माच्या तत्त्वांनुसार मालतीचे संगोपन कसे करत आहेत.