लिमा – साधारणपणे कोणत्याही विषयावर सहसा चर्चेत नसलेला पेरू हा देश सध्या मात्र महिला त्या गायब होण्याच्या विषयाने चर्चेत आला आहे गेल्या काही वर्षापासून दरवर्षी पेरूमधील महिला गायब होत असून त्यामध्ये लहान मुलांची मुलींचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महिला व लहान मुली गायब होण्याचे प्रमाण असेच कायम राहिले तर येत्या काही वर्षांमध्ये पेरूमध्ये मुली आणि महिलाच राहणार नाहीत अशी भीती समाजशास्त्रज्ञांनी ही व्यक्त केली आहे दरवर्षी साधारण 5000 पेक्षा जास्त मुली व महिला गायब होत आहेत तुमचा व महिलांचा कितीही तपास केला तरी कोणताही निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही वेश्याव्यवसायासाठी किंवा इतर कारणासाठी या महिला व मुली गायब केल्या जात असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे पण चा तपासच पुढे जात नसल्यामुळे पोलिसांनाही ठोस ते निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही.
तू देशाची लोकसंख्या फक्त तीन कोटी 20 लाख एवढी आहे आणि गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी महिला गायब होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे प्रकरणाची दखल आता पेरूमधील महिला संघटनांनीही घेतली असून त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे या महिला व मुली कोठे गायब होतात.
त्याचा शोध घ्यावा अशी मागणी या महिला संघटनांनी केली आहे नुकताच व्हॉट हॅपन्स टू देम नावाचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केला असून त्यामध्ये 2022 मध्ये तब्बल 5380 महिला गायब झाल्याची नोंद करण्यात आली आहे 2023 या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्येच साडेतीन हजार पेक्षा जास्त महिला गायक झाल्या आहेत पेपत्ता महिला आणि मुलींबाबत जरी पोलीस स्थानकामध्ये नोंद केली जात असली तरी तपासच पुढे सरकत नाही अशी परिस्थिती आहे काही महिला व मुलींची हत्या होऊ शकते काही मुलामुला महिलांना वेश्याव्यवसायासाठी विकले जाऊ शकते अशा शक्यताही तपासल्या जात आहेत.
प्रत्येक मुली व महिला स्वखुशीने इतरत्र जात असल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी भूमिकाही काही वेळा पोलीस घेतात पण महिला संघटनांना मात्र ही भूमिका मान्य नाही वेश्याव्यवसायासाठी किंवा इतर अनेक कामांसाठीच यांचा वापर करण्यासाठी महिला व मुलींना गायब करणारी एक असून त्याचा शोध पोलिसांना घ्यावा अशी मागणी महिला संघटनांनी केली आहेत.