नवी दिल्ली – पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असलेल्या एकूण 12 ठिकाणांवर एनआयएकडून (NIA) छापे टाकण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, मदुराई, तामिळनाडू आणि महाराष्ट्र आदी सहा राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
मुंबईतील विक्रोळी पश्चिम (mumbai raid) येथे असलेल्या वाहिद शेख याच्या घरीही एनआयएकडून छापा (Nia raid) टाकण्यात आला आहे. वाहिद शेखला 2007मध्ये झालेल्या ट्रेन ब्लास्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. परंतु त्याला 2015 मध्ये न्यायालयाने सर्व आरोपांतून मुक्त केले होते. मात्र, वाहिद शेख याचा पीएफआयशी संबंध असल्याने या संशयातून आज (ता. 11 ऑक्टोबर) सकाळीच त्याच्या घरी एनआयएचे पथक दाखल झाल्याची माहिती आहे.
देशभरातील पीएफआयशी संबंधित ठिकाणी एनआयएकडून आज सकाळपासून छापेमारीला सुरुवात करण्यात आली. बिहारमधील पाटणा येथील फुलवारी शरीफ भागातील दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत देशविरोधातील संशयास्पद कागदपत्रे, शस्रे आणि तलवारी आदी साठा जप्त करण्यात आला आहे.
एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की दहशतवादी आणि हिंसाचाराची कृत्ये करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी कट रचण्यात आला होता. आरोपींनी फुलवारी शरीफ येथील अहमद पॅलेसमध्ये भाड्याने घेत येथे हिंसाचाराचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि गुन्हेगारी कटाच्या बैठका आयोजित करण्यासाठी केला.