पुलवामा हल्ल्याशी संबंधाचा संशय
पुणे – इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रांत (आयएसकेपी) संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील एका पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले आहे. भारतातील पुलवामासह अन्य देशांतील दहशतवादी हल्ल्यांशी या व्यक्तींचा संबंध असल्याचा संशय आहे.
दिल्ली, मुंबई येथील “एनआयए’ची टीम महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकासह (एटीएस) पुणे येथे पोहोचली येरवडा येथील एक महिला आणि कोंढवा येथील एका व्यक्तीस ताब्यात घेतले. पुणे शहर पोलीस अधिकाऱ्यांनी “एनआयए’ पथकाला मदत केली. ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये डायरी एन्ट्री केली आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले. फोन कॉलवरून त्यांचा संशय आला होता.