11 संशयित दहशतवाद्यांविरोधात एनआयएचे आरोपपत्र

नवी दिल्ली  – राष्ट्रीय तपास यंत्रणेने पश्‍चिम बंगाल आणि केरळमधील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मुर्शिद हसन याच्या नेतृत्वात पश्‍चिम बंगाल आणि केरळ राज्यात अल कायदा तरुणांना प्रोत्साहित करून आपल्या जाळ्यात ओढत होती, त्याच माहितीच्या आधारे एनआयएने हा गुन्हा दाखल केला होता.

अल कायदाशी संबंधित दहशतवादी देशाच्या विविध भागात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कट आखत होते. केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन जणांना पश्‍चिम बंगालमधून अटक करण्यात आली.

मुर्शिद हसन हा पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अल कायदाच्या हॅंडलरच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून अल कायदामध्ये भरती होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रचार केला जात होता. मुर्शिद हसन आणि त्याच्या इतर साथीदारांकडून तरुणांचे कट्टरपंथीकरण करून अल कायदामध्ये अधिकाधिक तरुणांची भरती करत होते. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथी गोष्टींचा प्रसार सुरू केला होता आणि भारतात हिंसक कारवाया करण्यासाठी अल कायदा ही संघटना अनेकांना आपल्या संघटनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.