मुंबई – एनआयएचे पथक देशभरात सातत्याने कारवाई करत आहे. दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचे दोन साथिदार एनआयएच्या गळाला लागल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतून या दोघांना एनआयएने ताब्यात घेतले आहे.
आरिफ अबुबकर शेख (वय, 59) व शकील शेख उर्फ छोटा शकील (वय, 51) अशी एनआयएने अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. हे दोघेही मुंबईतील ओशिवरा परिसरात वास्तव्यास आहेत. दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील आणि अटक करण्यात आलेल्या या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. त्याच प्रकरणात एनआयएने चौकशी केली आणि त्यानंतर या दोघांनाही अटक केली आहे.
हे दोन्ही आरोपी दाऊद इब्राहिमच्या डी गँगसाठी टेर फंडींगसाठी मुंबईतून पैसे जमा करत असल्याचा आरोप आहे. या दोघांमध्ये आणि छोटा शकील याच्यात महिनाभरापूर्वी आर्थिक व्यवहार झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान या दोघांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. याशिवाय एनआयएच्या पथकाने देशातील अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आसून अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनूसार, इंटरपोलने छोटा शकीलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवत असे. तसेच खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. एनआयएच्या टीमने मुंबई आणि उपनगरात एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली होती. 9 मे रोजी करण्यात आलेल्या या छापेमारी दरम्यान 21 वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते.