लाहोर : पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये रात्री उशिरा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट एवढा जोरदार होता की त्याचा आवाज आणि हादरे दूरपर्यंत ऐकू गेले तसेच यामुळे आजूबाजूला उभी असलेली वाहने देखील उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. कराचीमध्ये हा स्फोट झाला असून यावेळी बाजारपेठेत प्रचंड गोंधळ उडाला होता. या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींची संख्या १३ पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या. अनेक वाहनांचेही नुकसान झाले.
कचराकुंडीच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बॉम्बस्फोटात सुमारे दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट टायमरने करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळावरून लोकांना हटवण्यात आले आहे. शहराचे केंद्र जेथे स्फोट झाला. त्यामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. या भागाला डाउनटाउन म्हणतात. त्याचबरोबर स्फोटामुळे आजूबाजूच्या हॉटेल आणि घरांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याच वेळी, सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत.