ब्लोएमफोन्टेन – यजमान दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका सुरू आहे. या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बुधवारी झालेल्या लढतीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. या सामन्यात दोन खेळाडूंची कामगिरी सरस झाल्याने या दोन्ही खेळाडूंना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
Career best 6-58 | career best 129*
That’s that #ProteaFire pic.twitter.com/69WoFwQ7KV
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 4, 2020
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनजीडीने ऑस्ट्रेलियाचे 6 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 271 धावांवर संपला. हा सामना सहज जिंकताना दक्षिण आफ्रिकेच्या जानेम मलानने 139 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 129 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा विजय साकार केल्याने या दोघांनाही सामनावीर पुरस्कार मिळाला.