वाठार स्टेशन (प्रतिनिधी)- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असतानासुद्धा काही नागरिक वाठार स्टेशन तसेच परिसरात विनाकारण फिरत असल्यामुळे त्यांच्या ५५ मोटरसायकली वाठार पोलिसांनी जप्त केल्याची माहिती दिली.
विनाकारण फिरणारी काही चारचाकी वाहनेसुद्धा जप्त केली आहेत व गुन्हे दाखल केले आहेत. वाठार पोलिसांनी इतरही विविध प्रकारचे १३ गुन्हे दाखल केले आहेत. येथून पुढेही संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या मोटरसायकली जप्त करण्यात येतील व वेळप्रसंगी कारवाईसुद्धा केली जाईल. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी सांगितले.