मुंबई : लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने फास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Bollywood Actor Sushant Singh Rajput commits suicide at his residence in Mumbai pic.twitter.com/Z6l5BzrmE5
— ANI (@ANI) June 14, 2020
सुशांतने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सुशांतच्या मित्रांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे की तो मागील 6 महिन्यांपासून तणावात होता.
सुशांतच्या मित्रांनी सांगितले की, तो नैराश्यामुळे औषधे घेत होता. काल रात्री सुशांतचे काही मित्रही त्याच्याबरोबर होते. सकाळी सुशांतच्या रूमचा दरवाजा उघडला नाही तर त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. आतमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अस्वस्थेत होता. त्यानंतर नोकराने पोलिसांना बोलावले. तसेच चार दिवसांपूर्वी सुशांतची मॅनेजर दिशा यांचाही इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता.
सुशांत ने ‘किस देश में है मेरा दिल’ नावाच्या मालिकेपासून त्याच्या करियरची सुरवात केली होती. पुढे एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो प्रचंड लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये ‘काय पो छे’ या चित्रपटातून त्याने एंट्री केली. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमांस’ आणि ‘एम एस धोनी’ मधून त्याने प्रेक्षकांची मने त्याने जिंकली. तो त्याच्या शेवटच्या’ छिछोरे’ या चित्रपटात पाहायला मिळाला.