बॅंक खाती गोठवली जाऊ नयेत याकरिता विजय मल्ल्याचे जोरदार प्रयत्न

लंडन -भारतीय बॅंकांनी मद्यसम्राट विजय मल्ल्याची बॅंक खाती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर त्यावर स्थगिती आणण्याचे मल्ल्यांचे प्रयत्न सुरू असून, त्याने कोर्टात त्याच्या आर्थिक चणचणीची कहाणी ऐकविली. माझी बॅंक खाती गोठवली जाऊ नयेत अशी विनवणी मल्ल्याने कोर्टाला केली आहे.

माझ्याकडे पैसे नाहीत. पत्नीच्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो. पर्सनल असिस्टंट, ओळखीचे उद्योजक आणि मुलांकडून मला उधारी घ्यावी लागते. ज्या 13 बॅंकांचे मल्ल्याने 11 हजार कोटी रुपये थकविले आहेत, त्या बॅंकांनी गेल्यावर्षी 11 सप्टेंबर रोजी त्याच्या विरोधात कोर्टात दिवाळखोरी याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे.

बॅंकांच्या याच याचिकेवर एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यानं कोर्टापुढे बॅंक खाती न गोठवण्याची आणि दिवाळखोर जाहीर न करण्याची विनंती केली आहे. माझी व्यक्‍तिगत संपत्ती 2,956 कोटी रुपये एवढी राहिली आहे. बॅंकांशी सेटलमेंट करण्यासाठी या संपूर्ण संपत्तीची माहिती कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सादर केली असल्याचं त्यानं म्हटलं आहे. बॅंकांनीही मल्ल्याकडून मिळालेली ही माहिती यूके कोर्टाला दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.