जळगाव – अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याने सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. महिनाभरात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम दोन हजार रुपयांनी कमी होऊन ते 34 हजारांवरून 32 हजारांवर आले आहेत.
चांदीचे भाव 41 हजार 500 रुपयांवरून ते 39 हजारांवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने तसेच सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असल्याने हा परिणाम झाला असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. गेल्या महिन्यात 72 रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे दर 69.02 रुपयांवर आले.
26 फेब्रुवारी रोजी सोने 34 हजार रुपयावर पोहोचले होते. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते 33 हजारांवर आले. 9 मार्च रोजी 32 हजार 800 रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत आहेत. गेले तीन दिवस सोने 32 हजारांवर कायम राहिले.