तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉंच्या पतीची फसवणूक

कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉं यांचे पती निखील जैन यांची 45 हजारांची फसवणूक झाली आहे. व्हीआयपी नंबर देतो असे सांगून जैन यांच्याकडून पैसे घेण्यात आल्याचे जैन यांनी म्हटले आहे.

निखिल यांना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात एका टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याच्या ई-मेलवरून व्हीआयपी नंबरसाठी विचारणा झाली होती. जर एखादा व्हीआयपी फोन नंबर किंवा विशिष्ट आकडे असलेला फोन नंबर असेल तर संपर्क साधण्याबाबत या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. या ई-मेलला उत्तर दिल्यानंतर एका बॅंक खात्यात 45 हजार रुपये जमा करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार जैन यांनी रक्‍कम जमा केली. मात्र, त्यांना नंबर मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निखिल यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

Leave A Reply

Your email address will not be published.