पुणे – एका व्यवसायीकाला घराचे पेस्ट कंट्रोल करणे भलतेच महागात पडले आहे. पेस्ट कंट्रोल करुन घराला कुलूप लावून गेल्यावर चोरट्यांनी घरावर डल्ला मारला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिणे आणी हिऱ्याचा हार असा 21 लाख 16 हजाराचा ऐवज चोरुन नेण्यात आला.
याप्रकरणी शंतनू गणेशराव ढोले-पाटील यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शंतनू यांनी 7 डिसेंबरला घरात पेस्ट कंट्रोल केले होते. यामुळे ते घर बंद करुन तळेगाव येथील फार्म हाऊसवर रहायला गेले.
दुसऱ्या दिवशी घर उघडले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. सोने-चांदी आणी हिऱ्यांच्या दागिण्यांची चोरी करण्यात आली. घटनास्थळी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पत्की यांनी भेट दिली.