Sugarcane Nursery : उत्तर प्रदेशात ऊस उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे, तर महिला गट आता ऊस लागवडीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. राज्यातील ऊस विभागात सहभागी होऊन महिला ग्रुप्सच्या माध्यमातून रोपांची निर्मिती करत आहेत. शेतकऱ्यांना उसाचे एक रोप 3 रुपयांमध्ये दिले जाते तर सरकार महिलांना प्रत्येक रोपावर 1.30 रुपयांचे अनुदान देते. मुझफ्फरनगर जिल्ह्यात 3661 महिला ऊस लागवडीद्वारे जोडल्या गेल्या आहेत. शरद ऋतूतील 23.51 लाख रोपे महिलांनी तयार केली आहेत.
मुझफ्फरनगरमध्ये उसाची रोपे तयार करणाऱ्या महिलांचे 147 गट तयार करण्यात आले आहेत. या महिला आता सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. या कामाचा योग्य फायदा होत असल्यामुळे महिला आपल्या कुटुंबाला देखील हातभार लावत आहे.संपूर्ण जिल्ह्यांमधून या महिलांच्या कामाच कौतुक होताना दिसत आहे.
कसं चालत काम
केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. उसाची रोपे तयार करणाऱ्या ऊस विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात महिला गट तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महिला दोन वेळा उसाची रोपे तयार करतात आणि नंतर ही रोपे शेतकऱ्यांना विकली जातात.
ऊस विभाग गटातील महिलांना रोपे तयार करण्यासाठी 1.30 रुपये अनुदान म्हणून देतात. ही रोपटी महिला तीन रुपयांना विकतात. रोपे लावून केवळ उसाचे उत्पादनच नाही तर महिलांचे उत्पन्नही वाढत आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील महिला गटाने एका वर्षात 80 लाख उसाची रोपे तयार केली आहेत. महिला गटाशी संबंधित असलेल्या सोनिया चौहान सांगतात की, पूर्वी त्या घरात काम करत होत्या पण आता ऊसाची रोपे तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहे.
32 लाख रुपयांचे अनुदान मिळाले
2022-23 मध्ये ऊस विभागाकडून मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका महिला गटाला 32 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. जिल्ह्यात सुमारे 80 लाख उसाची रोपे महिलांनी तयार केली. जिल्हा ऊस अधिकारी संजय सिसोदिया सांगतात की, अनेक ऊस उत्पादक महिलांना रोजगार आणि अतिरिक्त उत्पन्न दोन्ही मिळत आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी हे एक चांगले माध्यम आहे.