Stock Market: या आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत निराशाजनक ठरले. आजचे सत्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरर्ससाठी देखील अत्यत निराशाजनक राहिले. आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्येही जोरदार विक्री दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी BSE सेन्सेक्स 523 अंकांनी घसरून 71,072 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 166 अंकांच्या घसरणीसह 21,616 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी मिड कॅप निर्देशांक 1213 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक 652 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर बीएसई मिड कॅप 1038 अंकांच्या घसरणीसह आणि बीएसई स्मॉल कॅप 1443 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
मार्केट कॅप 8 लाख कोटींनी घटली –
शेअर बाजारातील या घसरणीमुळे बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घसरण झाली आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 378.85 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 386.43 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात बाजाराच्या बाजारमूल्यात 7.58 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
आजच्या व्यवहारात वाढलेले आणि घटलेले शेअर्स –