Ashok Chavan Resignation : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसपदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील राजकीय भूकंप होणार का ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशात आता राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. चव्हाण यांनी हे दावे फेटाळून लावले होते. मात्र अखेर त्यांनी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.मी आज माझ्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. ते माध्यमांशी बोलता होते.
तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? असा सवाल विचारला असता चव्हाण म्हणाले,”मी माझ्या सर्व काँग्रेस पदांचा देखील राजीनामा दिला आहे.मी अजून कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. पुढील दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल असं स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.तसेच मी कधीही काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोष्टी चव्हाट्यावर मांडलेल्या नाहीत कालपर्यंत मी पक्षासाठी एकनिष्ठतेने काम केलेलं आहे. असंही चव्हाण यावेळी म्हणाले.
#WATCH | After resigning from Congress, Former Maharashtra CM Ashok Chavan says, “I have resigned from the Assembly membership as an MLA. I have given my resignation to the Speaker. I have resigned from the Congress Working Committee and Congress primary membership. I have not… pic.twitter.com/n0AzYyT6tQ
— ANI (@ANI) February 12, 2024
चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या.. असे सूचक वक्तव्य केले. तसेच “भाजपसोबत अनेक मोठ्या पक्षांचे नेते येऊ इच्छितात. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. असेही त्यांनी म्हटले.