पुणे/नवी दिल्ली – सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाच्या करोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता देण्याच्या निर्णयावर तज्ज्ञांच्या समितीकडून आज विचार करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.
इंग्लंडने या लसीच्या वापराला मान्यात दिल्यानंतर तासाभरातच या घडामोडींना वेग आला. सीरमने या लसीच्या भारतात चाचण्या घेतल्या होत्या.
एकदा या लसीच्या वापराला मान्यता मिळाली की त्याच्या निर्यातीला जागतिक आरोग्य संघटनेची पात्रतापूर्व परवानगी मिळू शकेल. मात्र त्यासाठी महिन्याचा कालावधी लागू शकेल, ते देशासाठी लाभदायक ठरेल.
सीरमच्या पुण्यातील उत्पादन केंद्रात सुमारे चार ते पाच कोटी डोस देशातील वापरासाठी तयार केले आहेत.